Odisha Boat Capsizes: ओडिशातील झारसुगुडा येथे भीषण दुर्घटना; महानदीत बोट उलटल्याने महिलेचा मृत्यू, सात जण बेपत्ता

Odisha Boat Capsizes: ओडिशातील झारसुगुडा येथील महानदीत लहान मुले आणि महिलांसह सुमारे 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर सात जण बेपत्ता आहेत.
Odisha Boat Capsizes
Odisha Boat CapsizesEsakal

ओडिशातील झारसुगुडा येथील महानदीत लहान मुले आणि महिलांसह सुमारे 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर सात जण बेपत्ता आहेत. दरम्यान, बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.

काल (शुक्रवारी) ओडिशातील झारसुगुडा येथील महानदीमध्ये लहान मुले आणि महिलांसह सुमारे 50 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर सात जण बेपत्ता आहेत. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची भरपाई देण्याचे जाहीर केली आहे.

मृत आणि बेपत्ता व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, ही बोट बरगढ जिल्ह्यातील बांधीपाली भागातून प्रवाशांना घेऊन जात होती. दरम्यान, शारदाजवळ ही दुःखद घटना घडली आहे.

Odisha Boat Capsizes
Arvind Kejriwal News : जामिनासाठी मी लकवा मारून घेण्याचा धोका पत्करेन का? केजरीवाल यांचा कोर्टासमोर सवाल

'मच्छिमारांनी 35 प्रवाशांना वाचवले'

स्थानिक मच्छिमारांनी तात्काळ 35 प्रवाशांना वाचवले. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आणखी सात प्रवाशांची सुटका केली. बोटीतील सात जण अद्याप बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे. मात्र महानदीच्या जोरदार प्रवाहामुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरत आहे.

Odisha Boat Capsizes
Lok Sabha Election 2024: पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान, महाराष्ट्रासह 'या' राज्यांची टक्केवारी किती?

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नुकसान भरपाईची केली घोषणा

दरम्यान, बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी बचाव पथके सर्व तैनात करत आहेत. तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नुकसान भरपाई जाहीर केली आहे. या दु:खद घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची रक्कम दिली जाईल, असे ते म्हणाले.

Odisha Boat Capsizes
BJP on Congress : 'लव्ह जिहाद'मुळे काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीचा खून? पक्षाकडून मात्र 'लव्ह स्टोरी'चा एँगल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com