मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याने म्हशीला नेले पोलिस ठाण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याने म्हशीला नेले पोलिस ठाण्यात

मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याने म्हशीला नेले पोलिस ठाण्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोपाळ : चेटूक झाल्याने म्हैस दूध काढू देत नाही अशी तक्रार मध्य प्रदेशमधील एका शेतकऱ्याने केली. त्यासाठी म्हशीला घेऊनच त्याने पोलिस ठाणे गाठले. शनिवारी तक्रार नोंदविल्यानंतर तो पुन्हा म्हैस घेऊन चौकीवर गेला होता. योगायोगाने रविवारी सकाळी त्याच्या म्हशीने दूध काढू दिले.

भिंद जिल्ह्यातील नायगावमध्ये हा प्रकार घडला. तसा व्हिडिओही व्हायरल झाला. बाबूलाल जाटव असे त्याचे नाव असून तो ४५ वर्षांचा आहे. पोलिस उपनिरीक्षक अरविंद शहा यांनी सांगितले की, गेले काही दिवस म्हैस दूध नसल्याचे बाबूलालचे म्हणणे होते. म्हशीवर चेटूक झाल्याचे काही गावकऱ्यांनी त्याला सांगितले.

तक्रार दिल्यानंतर चार तासांनी तो पुन्हा पोलिस ठाण्यात आला आणि आमची मदत मागितली. एखाद्या पशुवैद्यक तज्ज्ञाचा सल्ला घेऊन त्याला मदत करा असे मी स्थानकप्रमुखांना सांगितले. रविवारी सकाळी तो चौकीत आला आणि म्हशीने दूध काढून दिले असे सांगून आमचे आभार मानले.

loading image
go to top