esakal | जिद्द! कोविड वॉर्डमध्ये कोरोना रुग्ण करतोय CA ची तयारी

बोलून बातमी शोधा

जिद्द! कोविड वॉर्डमध्ये कोरोना रुग्ण करतोय CA ची तयारी
जिद्द! कोविड वॉर्डमध्ये कोरोना रुग्ण करतोय CA ची तयारी
sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या चांगलाच जोर धरला आहे. यात ४५पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसोबतच तरुणांमध्येही या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे सध्या कोविड वॉर्डमध्ये कोरोनाग्रस्त तरुणांची संख्या वाढत आहे. यामध्येच ओडिसामधील एक तरुण अनेकांसाठी सकारात्मकतेचं उत्तम उदाहरण ठरत आहे. कोरोना काळातही हा मुलगा सीएच्या परीक्षेची तयारी करत आहे. विशेष म्हणजे कोरोनासारख्या संकटावर मात करुन आपण सीएची परीक्षा यशस्वीपणे देऊ ही जिद्द या विद्यार्थ्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

आयएएस ऑफिसर विजय कुलंगे यांच्यासह अनेकांनी या विद्यार्थाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला ओडिसामधील एका कोविड सेंटरमध्ये अॅडमिट करण्यात आलं आहे. मात्र, या संकट काळातही ही विद्यार्थी CA परीक्षेची तयारी करत आहेत. त्याची ही जिद्द, मेहनत व चिकाटी पाहून अनेकांनी त्याच कौतुक केलं आहे.

हेही वाचा: Veg - Non veg; रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवणारे पदार्थ

"यश सहज मिळत नाही, त्यासाठी त्याग भावना असावी लागते. मी कोविड-१९ रुग्णालयांची भेट घेतली त्यावेळी हा विद्यार्थी सीए परीक्षेचा अभ्यास करताना दिसून आला. तुमची समर्पणाची भावना तुमच्या वेदना, दु:ख सारं काही विसरायला लावते. त्यानंतर मिळणारं यश हे केवळ औपचारिकता असते. कारण, खरी लढाई तुम्ही आधीच जिंकला असतात", असं विजय कुलंगे यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

दरम्यान, इंस्टीट्युड ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियाने सीए इंटरमीडिएट आणि अंतिम परीक्षा रद्द केली आहे. जी मे २०२१ मध्ये होणार होती.