esakal | आधी कोरोना नियंत्रणात आणू, मग CAA वर विचार करु :अमित शहा
sakal

बोलून बातमी शोधा

 caa, Covid 19 vaccination, amit shah

दोन दिवसीय बंगाल दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात भाष्य केले. CAA संदर्भातील काही नियम करणे अद्यापही बाकी आहे.

आधी कोरोना नियंत्रणात आणू, मग CAA वर विचार करु :अमित शहा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

Union Home Minister Amit Shah Bengal Visit : देशातील कोरोनाजन्य परिस्थिती आवाक्यात आल्यानंतरच सरकार सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात (CAA) पुढची पावले उचलणार आहे. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. कोरोनामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भाती काही नियम तयार करणे अद्यापही बाकी आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर नव्या कायद्यासंदर्भात पुढची पावले उचलली जातील, असे अमित शहांनी म्हटले आहे. 

दोन दिवसीय बंगाल दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात भाष्य केले. CAA संदर्भातील काही नियम करणे अद्यापही बाकी आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. सध्याच्या घडीला कोरोनाची साखळी तोडणे हेच सरकारचे प्राधान्य आहे. लसीकरण अभियान सुरु करुन कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात विचार करु, असे शहा यावेळी म्हणाले.  

'बंगालमध्ये भाजप दुहेरी आकडा गाठणेही कठीण; माझं टि्वट सेव्ह करा, नाहीतर...'

पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या मुद्यावरुन त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. केंद्रावर आरोप करण्यापूर्वी तृणमूल काँग्रेसने नियमावली पाहावी, असा टोलाही त्यांनी लगावला. जनेतेची दिशाभूल करण्यासाठी तृणमूल काँग्रेस आतले-बाहेरले असा अपप्रचार करत आहेत. भाजपची सत्ता आली तर भूमिपूत्रच राज्याचे नेतृत्व करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.