
गौरी लंकेश हत्याप्रकरणी न्यायालयात केबल ऑपरेटर, वॉचमनची झाडाझडती
बंगळूर : ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा खटला चालवणाऱ्या विशेष न्यायालयाने काल खटल्याच्या तिसऱ्या दिवशी दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. वकील एस. बालन यांच्या नेतृत्वाखालील फिर्यादी पथकाने आणि गंगाधर शेट्टी आणि कृष्णा मूर्ती यांच्या नेतृत्वाखालील बचाव पथकाने घटनास्थळी आलेल्या केबल ऑपरेटरची तपासणी केली.
५ सप्टेंबर २०१७ रोजी गौरी यांच्या घरातील केबल दुरुस्त करण्यासाठी केबल ऑपरेटरला बोलावले होते. तो आला तेव्हा कंपाउंडमध्ये गौरी लंकेश यांचा मृतदेह आढळून आला. राजराजेश्वरीनगरातील लंकेश यांच्या निवासस्थानासमोर राहणाऱ्या वॉचमनची साक्ष देखील तपासली गेली. तो देखील त्या दिवशी संध्याकाळी गौरी यांच्या घरी आला होता. गोळीबाराचा आवाज ऐकला आणि इतर लोक तेथे आल्यावर त्याने गुन्ह्याचे दृश्य पाहिले. रात्री साडेआठ च्या सुमारास गौरी यांचा घराबाहेर दोन दुचाकीस्वारांनी गोळ्या घालून खून केला होता.
Web Title: Cable Operator Watchman Witness Answers Gauri Lankesh Murder Case Bangalore
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..