Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये बंडखोर तृणमूल गटाला धक्का; ऋतब्रत बॅनर्जींचे विरोधी पक्षनेतेपद रद्द

Calcutta High Court Verdict: पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने रद्द केली; विधानसभा अध्यक्षांना १० दिवसांत नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश, मुख्य प्रतोद अखरुज्जमान यांची नियुक्तीही रद्द.
Bengal Politics

Bengal Politics

esakal

Updated on: 

Kolkata: पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने बंडखोर गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी केलेली नियुक्ती रद्द केली आहे. तसेच मुख्य प्रतोद अखरुज्जमान यांची नियुक्तीही रद्द केली. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही पदांबाबत १० दिवसांत नव्याने आणि कारणांसह निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Loading content, please wait...