लशीसाठी वापरतात वासराच्या रक्तातील अंश; केंद्राने दिलं उत्तर

Covaxin
Covaxin
Summary

कोव्हॅक्सिन लसीबाबत काँग्रेस नेत्याने धक्कादायक असा दावा केला आहे. कोव्हॅक्सिन तयार करण्यासाठी गायीच्या वासराच्या रक्तातील अंश वापरला जातो असं त्यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - कोव्हॅक्सिन लसीबाबत काँग्रेस नेत्याने धक्कादायक असा दावा केला आहे. कोव्हॅक्सिन तयार करण्यासाठी गायीच्या वासराच्या रक्तातील अंश वापरला जातो असं त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहिताचा दाखला दिला आहे. लस तयार करण्यासाठी 20 दिवसांपेक्षा कमी वयाच्या वासराची हत्या केली जाते असाही दावा त्यांनी केलाय. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक गौरव पांधी यांनी ट्विटरवर असा दावा करताना आरटीआय अंतर्गत मिळालेली माहितीसुद्धा शेअर केली आहे. त्यांनी म्हटलं की, आरटीआयने दिलेलं उत्तर हे विकास पाटनी नावाच्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नावर सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने उत्तर दिलं आहे.

दरम्यान, वासराच्या रक्ताचा अंश हा विरो सेल्सच्या रिवायव्हल प्रोसेससाठी केला जातो. विरो सेल्सचा वापर कोव्हॅक्सिन तयार करण्यासाठी होत आहे. मात्र त्याचा अंश लसीमध्ये आहे असं म्हणता येणार नाही असं स्पष्टीकरण केंद्राने दिलं आहे.

गौरव यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदींच्या सरकारने मान्य केलं आहे की, भारत बायोटेकच्या लशीमध्ये गाईच्या वासारचं सीरम (रक्ताचा अंश) आहे. हे खूप वाईट आहे. याची माहिती लोकांना आधीच द्यायला हवी होती.

Covaxin
अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; मृतांची संख्या 6 लाखांच्या पार

केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, जगभरात विरो सेल्सच्या वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गोवंश आणि इतर जनावरांच्या सीरमचा वापर केला जातो. ही एक ग्लोबल स्टँडर्ड प्रक्रिया आहे आणि याचा वापर फक्त सुरुवातीच्या टप्प्यात केला जातो. अखेरच्या टप्प्यात काहीच वापर होत नाही. त्यामुळे याला लशीचा भाग आहे असं म्हणता येणार नाही. गेल्या अनेक दशकांपासून पोलिओ, रेबीज आणि इन्फ्लुएन्झाच्या औषधांमध्ये याचा वापर केला जात आहे. विरो सेल्स तयार करण्यासाठी अनेकदा पाणी आणि केमिकल्सने धुतल्या जातात. बफरची ही प्रोसेस झाल्यानंतर विरो सेल्सच्या व्हायरल ग्रोथसाठी कोरोना व्हायरसने संक्रमित केलं जातं.

Covaxin
संधी देऊन सुद्धा ट्विटरचा सहकार्य करण्यास नकार- रविशंकर प्रसाद

व्हायरल ग्रोथच्या प्रकियेत विरो सेल्स पूर्णपणे नष्ट होतात. यानंतर नव्या व्हायरसलासुद्धा निष्क्रिय करण्यात येतं. या सर्व प्रक्रियेनंतर याचा वापर लस तयार करण्यासाठी केला जातो. अशा प्रकारच्या अनेक प्रकिया पार पडतात. शेवटच्या टप्प्यात वासराच्या सीरमचा वापर होतो असं यावेळी म्हणता येत नाही. त्यामुळे हे स्पष्ट होतं की, लसीमध्ये वासराचं सीरम वापरलं जात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com