गोव्यात कर्करोग फोफावतोय

तेजश्री कुंभार
गुरुवार, 12 जुलै 2018

पणजी : बदलती जीवनशैली आणि वाढत्या व्यसनाधिनतेमुळे राज्यात कर्करोगाचे प्रमाण फोफावते आहे. गेल्या सहा महिन्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल 162 जणांना कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले आहे. हा आकडा केवळ गोमेकॉतील असून इतर खासगी रुग्णालयातही कर्करोगाचे रुग्ण उपचार घेत असल्याने हा आकडा दुप्पटहून अधिक आहे. राज्यभरात प्रत्येक महिन्याला सुमारे 20 रुग्ण कर्करोगाने ग्रस्त होत चालल्याचे प्रमाण वाढतेच असल्याचे कर्करोगतज्ञांचे मत आहे. 

सहा महिन्यांपासून गोमेकॉत कर्करोगावर उपचार घेण्यास येणाऱ्या रुग्णांची स्वतंत्र रेजिस्ट्री करण्यात आली आहे. नोंद झालेल्या 162 जणांमध्ये 62 पुरुष आणि 60 महिला आहेत. 162 जणांपैकी सुमारे 18 रुग्ण बिगरगोमंतकीय आहेत. 

मोठ्या आतड्यांशी निगडित असणाऱ्या कोलोन कर्करोगाचे प्रमाण पुरूषांच्यात सर्वाधिक असून रेजिस्ट्रीनुसार 23 रुग्ण कोलोन कर्करोगाचे तर सारकोमा कर्करोगाचे 5 आणि मेटॅस्टॅटिक कर्करोगाच्या 4 रुग्णांची नोंद आहे. ओरल कॅविटी म्हणजेच तोंडाशी संबंधित असणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण पुरूषांच्यात वाढते असून एकूण 10 रुग्णांना हा कर्करोग झाला आहे. 
फास्ट फुडसारख्या गोष्टींच्या अतिरेकामुळे होणारा अन्ननलिकेचा कर्करोग तर अनेकांची डोकेदुखी ठरत असल्याचे स्पष्ट होते. पुरूषांच्यात 20 जणांना तर महिलांच्यात 12 जणांना अन्ननलिकेच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. 

सहा महिन्यात 29 महिलांना कर्करोग 
गेल्या सहा महिन्यात 29 महिलांना स्तनांचा कर्करोग झाला असल्याची नोंद रजिस्ट्रीमध्ये आहे. अर्थात हा कर्करोग वेगवेगळ्या स्तरांमध्ये असलातरी महिलांच्यात वाढत असणारे स्तन कर्करोगाचे प्रमाण काळजीवर्धक आहे. कोलोन कर्करोगाच्या 12 रुग्ण आणि थायरॉईड कर्करोगाच्या 7 महिला रुग्णांची नोंद झाली आहे. 

सिगारेट, दारू आणि फास्टफुडचा अतिरेक 
कर्करोगाचे वाढत्या प्रमाणाचे मूळ व्यवसनाधिनतेमध्ये आणि मॉडर्न खाद्यशैलीत आहे. खाण्याबाबतच्या सवयी बदलत चालल्या आहेत, तसेच फास्टफुडचा अतिरेक वाढत आहे. महिलांच्यात वाढत जाणाऱ्या कर्करोगाची अनेक कारणे आहेत मात्र सिगारेट आणि मद्य यांचे एकत्रितपणे केले जाणारे दररोजचे सेवन ही गोष्ट अधिक कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. गोमेकॉत येणारे अनेक कर्करोगाचे रुग्ण मद्यपानाचे दररोज सेवन करीत असल्याचे आमचे निरीक्षण सांगत असल्याची माहिती गोमेकॉतील शस्त्रक्रिया विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेश पाटील यांनी दिली.

Web Title: cancer spreads in goa