esakal | वाद मिटला! 'सिद्धू पंजाबचं भविष्य', काँग्रेस नेत्याचं महत्त्वाचं विधान
sakal

बोलून बातमी शोधा

Navjot Singh Sidhu

वाद मिटला! 'सिद्धू पंजाबचं भविष्य', काँग्रेस नेत्याचं महत्त्वाचं विधान

sakal_logo
By
दीनानाथ परब

चंदीगड: पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसमधील (punja congress crisis) अंतर्गत वाद मिटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amrinder singh) आणि नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यातील वादावर पक्षाने तोडगा काढल्याची चर्चा आहे. मागच्या काही दिवसांपासून कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपसातील मतभेदांवर (diffrences) जाहीरपणे भाष्य केलं होतं. पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी तोडगा काढला आहे. (Capt Amarinder to remain Punjab CM Sidhu to head state Congress as party ends stalemate dmp82)

नव्या फॉर्म्युल्यानुसार, कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या मुख्यमंत्री कायम राहतील तर सिद्धू यांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. याशिवाय पंजाब काँग्रेस हिंदू आणि दलित समाजातून दोन कार्यकारी अध्यक्षांच्या नियुक्ती करणार आहे. या नव्या फॉर्म्युल्याची घोषणा लवकरच होऊ शकते. हरीश रावत पंजाब काँग्रेसचे प्रभारी आहेत. त्यांनीच सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यातील वाद मिटल्याची माहिती दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: इंधन दरवाढीविरोधात आंदोलन म्हणजे नौटंकी- देवेंद्र फडणवीस

"येत्या २ ते ३ दिवसात तोडगा समोर येईल. पक्षाचा निर्णय मान्य असेल, असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे" असं हरिश रावत म्हणाले. अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं हरीश रावत यांनी स्पष्ट केलं. "सिद्धू हे पंजाबचं भविष्य आहेत. कुठलाही निर्णय घेताना किंवा बोलताना त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी" असे हरीश रावत म्हणाले.

loading image