esakal | गांधी कुटुंबाला प्रश्न विचारणाऱ्या G-23 गटाला कॅप्टन अमरिंदर भेटणार? |Amarinder Singh
sakal

बोलून बातमी शोधा

captain amrinder singh

अमित शहांनंतर काँग्रेसमधील नाराज 23 नेत्यांना कॅप्टन भेटणार ?

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी पंजाबच्या (punjab) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amrinder singh) दिल्लीत आले आहेत. काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांची भेट घेतली होती. कॅप्टन थेट अमित शहा यांच्या भेटीला पोहोचल्याने काँग्रेसमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिल्लीमधील वास्तव्यात अमरिंदर सिग जी-२३ नेत्यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. G-23 हा काँग्रेसमधील नाराज नेत्यांचा एक गट आहे.

मागच्यावर्षी या G-23 मधील नेत्यांनी थेट गांधी कुटुंबाला पत्र लिहून पक्षाच्या नेतृत्वाबद्दल महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांचा गट म्हणून G-23 च्या नेत्यांकडे पाहिले जाते. काल अमरिंदर सिंग यांनी अमित शाह यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. पुढच्यावर्षी पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: मोबाइलचा फ्लॅश अंगावर पडला, कुर्ल्यात कोयत्याने वार करुन हत्या

बुधवारी जी-२३ मधील एक नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला. "आमच्या पक्षात अध्यक्ष नाहीय. त्यामुळे कोण निर्णय घेतोय, हे माहित नाही" असे कपिल सिब्बल म्हणाले. काँग्रेस नेते गुलाम नबी आझादही या जी-२३ चा भाग आहेत. त्यांनी सुद्धा मागच्यावर्षी जी-२३ नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षरी करुन सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची तातडीची बैठक बोलवण्याची मागणी केली होती.

loading image
go to top