esakal | मोबाइलचा फ्लॅश अंगावर पडल्याने कोयत्याने वार करुन हत्या, कुर्ल्यातील धक्कादायक घटना | Mumbai crime
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाइलचा फ्लॅश अंगावर पडला, कुर्ल्यात कोयत्याने वार करुन हत्या

मोबाइलचा फ्लॅश अंगावर पडला, कुर्ल्यात कोयत्याने वार करुन हत्या

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: सिगारेट पिताना एका तरुणाच्या मोबाइलची फ्लॅश (Mobile flash) पडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून (dispute) एकाची हत्या (Murder) झाल्याची घटना कुर्ला (kurla) नेहरूनगर परिसरात घडली आहे. माऊट एव्हहेस्ट सोसायटी, श्रमजिवी परिसरात ही घटना घडली आहे.

ओम विदयासागर खंडागळे आणि वैभव नावाची मुलं सिगारेट ओढत होती. त्यावेळी रोहित व आकश राखपसरे हे तिथून जात असताना, त्यांच्या मोबाइलचा फ्लॅश ओम आणि वैभववर पडली.

हेही वाचा: 'मुंबईत रस्त्यांचे "रस्ते" लागले, तिच थूकपट्टी...'; भाजपाचा हल्लाबोल

यावरून ओम खंडागळे आणि वैभव यानी दोघा भावांना बोलवून रोहित-आकाशशी वाद घातला. यावेळी आरोपीसोबत असलेल्या मित्रांनी रोहित राखपसरे याच्यावर कोयत्याने वार केले. जखमी अवस्थेत असलेल्या रोहितला राजावाडी रुग्णालयात नेले. उपचारा दरम्यान रोहितचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले.

loading image
go to top