esakal | मी भाजपमध्ये जाणार नाही पण काँग्रेस सोडणार - कॅप्टन अमरिंदर सिंग
sakal

बोलून बातमी शोधा

captain

भाजपमध्ये जाणार नाही पण काँग्रेसमध्ये थांबणार नाही - कॅप्टन अमरिंदर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपण भाजपमध्ये जात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच भाजपमध्ये जात नसलो तरी काँग्रेसमध्ये राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता अमरिंदर सिंग काय करणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. एनडीटीव्हीशी बोलताना अमरिंदर सिंग म्हणाले की, मी लवकर काँग्रेस सोडणार आहे. आता अपमान सहन होत नाही.

कॅप्टन अरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरु होती. आता त्यावर शिक्कामोर्तब यामुळे झालं आहे. दरम्यान, अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्यानं ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु होती. त्यानंतर एनडीटीव्हीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, मी भाजपमध्ये जाणार नाही.

हेही वाचा: पंजाबमध्ये एकाच दगडात दोन पक्षी मारणार काँग्रेस?

अमरिंदर सिंग म्हणाले की, सध्या तरी मी काँग्रेसमध्ये आहे पण काँग्रेसमध्ये राहणार नाही. मी अशा पद्धतीचं वागणं सहन करू शकणार नाही. ५० वर्षानंतर माझ्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थिती केली जाते हे सहन होणारं नाही. काँग्रेसकडून अमरिंदर सिंग यांची नाराजी दूर कऱण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अंबिका सोनी आणि कमलनाथ हे प्रयत्न करत आहे. मात्र मंगळवारपासून कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीत आहे. त्यांनी अद्याप स्पष्टपणे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चेसाठी कोणतीही इच्छा व्यक्त केलेली नाही. सध्या ते इतर पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज सकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. दोघांमध्ये पंजाबच्या सीमेवरील सुरक्षा आणि राज्यातील राजकीय संकट यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. १८ सप्टेंबरला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर उघड नाराजी व्यक्त केली होती. तसंच आपण पुढील वाटचालीबाबत लवकरच जाहीर करू असंही म्हटलं होतं.

loading image
go to top