पँगाँग तलावात चालवली कार; सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Car driven in Pangong Lake

Ladakh : पँगाँग तलावात चालवली कार; सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

लडाखमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तीन पर्यटक प्राचीन पँगाँग तलावात कार (Car driven in Pangong Lake) चालवताना दिसत आहेत. यामध्ये दोन पर्यटक कारच्या सनरूफला लटकून ओरडत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक पर्यटकांनी इंटरनेटवर आपला रोष व्यक्त केला. तर काही पर्यटकांनी पोलिसांकडे पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Car driven in Pangong Lake)

लडाख हे एक सुंदर ठिकाण आहे. हे देशातील सर्वांत पसंतीचे पर्यटन स्थळ आहे. परंतु, काही पर्यटक असे बेजबाबदारपणे वागून या ठिकाणाला घाणेरडे करीत आहे. व्हिडिओमध्ये तलावात फोल्ड होणारी खुर्ची दिसत आहे. या खर्चीवर दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या आणि चिप्सची पाकिटे दिसत आहेत. हा व्हिडिओ जवळपास पाच लाख वेळा पाहिला गेला आहे.

लडाखमध्ये ३५० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत.पँगाँग तलाव (Pangong Lake) अनेक पक्ष्यांच्या प्रजातींचे घर आहे. परंतु, पर्यटकांच्या अशा कृतीमुळे अनेक पक्ष्यांच्या प्रजातींचा अधिवास धोक्यात आला असावा, असे व्हिडिओ शेअर करणाऱ्याने लिहिले. सोबत इन्स्टाग्राम पेजची लिंक देखील पोस्ट केली आहे. आता तो व्हिडिओ (Video viral) काढून टाकण्यात आला आहे.

हेही वाचा: मोठी बातमी : शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान; बिनविरोध निवड

मूर्खपणा शिगेला पोहोचला आहे!! पूर्णपणे मूर्खपणा, असे एकाने म्हटले आहे. या गुंडांना लडाखमध्ये (Ladakh) प्रवेश करण्यास बंदी घातली पाहिजे, असे दुसऱ्याने लडाख आणि हरियाणा पोलिसांना टॅग करीत टिप्पणी केली. हरियाणा पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करण्यात आले आहे. कारण, ऑडी एसयूव्हीचा क्रमांक हरियाणाचा दिसत आहे.

Web Title: Car Driven In Pangong Lake Angry Reaction On Social Media Tourist Video Viral Ladakh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top