
शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान; बिनविरोध निवड
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांची बिनविरोध निवड झाली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या काही वेळापूर्वीच पाकिस्तानमध्ये नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी संसदेचे अधिवेशन सुरू होते. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान झाले आहे. इम्रान खान सत्तेतून काढून टाकल्यानंतर ते त्यांची जागा घेतील. (Shahbaz Sharif is the new Prime Minister of Pakistan)
पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे (पीएमएल-एन) अध्यक्ष शाहबाज शरीफ हे इम्रान खान यांना सत्तेतून काढून टाकल्यानंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले गेले होते. ते कट्टर वास्तववादी आहेत आणि काही वर्षांत त्यांनी स्पष्टवक्ता म्हणून नाव कमावले आहे. तीन वेळा माजी पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ यांचे ७० वर्षीय धाकटे भाऊ शाहबाज (Shahbaz Sharif) हे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि राजकीयदृष्ट्य़ा महत्त्वाच्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.
हेही वाचा: यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याने वाद; ट्विट करीत म्हणाल्या...
त्यांचा पक्ष पीएमएल-एन-विशेषतः: त्यांचे सुप्रीमो नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावावर सहमती दर्शवण्याची ही पहिलीच वेळ आहे. माजी अध्यक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सहअध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी संयुक्त विरोधी बैठकीत शाहबाज यांच्या नावाचा पंतप्रधानपदासाठी प्रस्ताव ठेवला होता. शनिवारी अविश्वास प्रस्तावाद्वारे इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले, हे विशेष...
पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान
नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांची पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. ३४२ सदस्यांच्या नॅशनल संसदेमध्ये त्यांना एकूण १७४ खासदारांचा पाठिंबा होता. ते इम्रान खान यांची जागा घेतील.
हेही वाचा: इम्रान खान आक्रमक; म्हणाले, मी या चोरांसोबत संसदेत बसणार नाही
पीटीआयने केला विरोध
पंतप्रधान (Prime Minister) निवडीसाठी सोमवारी पाकिस्तानच्या नॅशनल संसदेचे अधिवेशन बोलावण्यात आले होते. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे अध्यक्ष शाहबाज शरीफ, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी रविवारी या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने याला विरोध केला. सर्व खासदार राजीनामे देतील आणि नवीन पंतप्रधान निवडीवर बहिष्कार टाकतील, असे इम्रान खान (Imran Khan) म्हणाले होते.
Web Title: Shahbaz Sharif Is The New Prime Minister Of Pakistan Unopposed Selection Imran Khan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..