

Rescue Delay Costs Life As Car Falls Into Drain In Greater Noida
Esakal
भरधाव वेगात कार रस्त्याच्या कडेला असलेली संरक्षक भिंत तोडून थेट नाल्यातील पाण्यात कोसळली. यामुळे पाण्यात बुडून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. कार ३० फूट खोल पाण्यात पडल्यानंतर बचावकार्य जवळपास चार ते साडे चार तास सुरू होतं. तरुणाला बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ग्रेटर नोएडातील सेक्टर १५० एटीएस ली ग्रँडियोस इथं शुक्रवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.