
उत्तर प्रदेश: उसाच्या ट्रॅक्टरला मागून कार धडकल्यानं चौघांचा मृत्यू झाला आहे. यात कारमधील तिघांचा तर ट्रॉलीचं पंक्चर काढणाऱ्या एका मिस्त्रीचा समावेश आहे. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी इथल्या निघासनमध्ये हा अपघात झाला. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलंय. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.