दोन माजी पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या सांबित पात्राविरोधात गुन्हा दाखल

Case filed against Sambit Patra for tweets against Jawaharlal Nehru and Rajiv Gandhi
Case filed against Sambit Patra for tweets against Jawaharlal Nehru and Rajiv Gandhi
Updated on

नवी दिल्ली : देशाच्या दोन माजी पंतप्रधानांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणारे भाजप प्रवक्ते सांबित पात्रा यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी अशा निःस्वार्थ भावनेने काम केलेल्या दिवंगत पंतप्रधानाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्याचे काम भाजप प्रवक्ते सांबीत पात्रा यांनी केल्यामुळे देशभर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासह करोडो देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे देशात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस ब्रीजकिशोर दत्त यांनी महात्मा फुले पोलिस स्टेशन, कल्याण येथे मानहानीचा गुन्हा दाखल केला असल्याचे महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रेशनकार्डाच्या नियमात केंद्राकडून बदल; तब्बल एवढ्या लोकांना होणार फायदा

देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांचे स्वतंत्र लढ्यात मोठे योगदान आहे, त्यांच्या दूरदृष्टीतून आरोग्य, शिक्षण, सहकार, सार्वजनिक उद्योग, दळणवळण, शेती, सिंचन, संशोधन यांसह विविध क्षेत्रात उभ्या केलेल्या संस्था आज देशाला मार्गदर्शन करण्याचे काम करत आहेत. तसेच, माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांनी देशात डिजिटल क्रांती घडवून आणली, संशोधनावर भर देत विकासाला अधिक गतिमान करण्याचे काम त्यांनी केले, देशासाठी लढत आपले प्राणाची आहुती दिली आहे. त्यामुळे अशा महान व्यक्तिविरोधी प्रवृत्तींना सजा होत नाही तोपर्यंत कायदेशीर मार्गाने लढाई सुरूच राहील असे ब्रीजकिशोर दत्त यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com