AAP : मंत्र्यानेच गायब केल्या फाईल्स? दिल्ली सरकारच्या दक्षता विभागातून कागदपत्रे चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

arvind kejriwal news
arvind kejriwal newsesakal

नवी दिल्लीः दिल्ली सरकारच्या दक्षता विभागातून काही फाईल्स चोरी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. फाईल्स गायब करतांनाचा एक व्हीडिओ समोर आलेला आहे.

या सीसीटीव्ही फुटेजने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या सांगण्यावरुन फाईल्स गायब झाल्याचा आरोप होत आहे.

arvind kejriwal news
Dr. Tatyarao Lahane : "तुरुंगात जाऊ पण..." ; डॉ. लहाने यांनी उद्विग्नपणे केले जाहीर

याप्रकरणी दक्षता विभागाचे सचिव यांनी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्यावर आरोप केले आहेत. स्पेशल सेक्रेट्री यांनी आम आदमी पक्षाचे मंत्री सौरभ भारद्वाज यांच्यावर आरोप केले आहेत की, त्यांच्याच सांगण्यावरुन फाईल्स गायब झाल्या.

arvind kejriwal news
Narendra Modi : 'चाय पे चर्चा' या यशस्वी प्रयोगानंतर भाजपची नवी मोहीम; उद्या 'टिफिन मीटिंग'चा शुभारंभ

दरम्यान, गायब झालेली कागदपत्रे ही केजरीवाल सरकारने केलेल्या घोटाळ्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटचे चार्जशीट, मुख्यमंत्री निवासस्थानाचे पेपर्स, माहिती आणि प्रसारणासंबंधीचे कागदपत्रे, दिल्ली जलबोर्डाशी संबंधी प्रकरणं, जेलमध्ये असलेल्या मंत्र्यांशी संबंधित फाईल्स, इत्यादी दस्तावेज गायब झालेला आहे.

सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेज आणि फॅक्च्युअल रिपोर्टच्या आधारे तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दक्षता विभागाच्या स्पेशल सेक्रेटरींची चौकशी केली आहे. आता अज्ञात लोकांविरोधात पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com