नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या रविवारी पार पडलेल्या बैठकीवर ‘ऑपरेशन सिंदूर’ तसेच जातिनिहाय जनगणना या मुद्यांची छाप दिसून आली. .पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे राबविल्याबद्दल लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. ‘मोदी-३’ सरकारच्या स्थापनेला लवकरच पूर्ण होत असलेले पहिले वर्ष, आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, सुशासन आदी विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे उपस्थित होते. ‘रालोआ’शासित २० राज्यांचे मुख्यमंत्री आणि १८ उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यांतील महत्त्वपूर्ण योजनांचे सादरीकरण केले. बैठकीच्या प्रारंभी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली..राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी लष्कर आणि पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. जे. पी. नड्डा तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले. नक्षलवादानेग्रस्त असलेल्या भागांतील लोकांचे जीवन सुरळीत होण्यासाठी तसेच अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले. नक्षलवादाविरोधातील उपाययोजनांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरील प्रस्ताव हरियानाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी मांडला. आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी त्याला अनुमोदन दिले. भाजपने लोकांना जी आश्वासने दिलेली आहेत, त्यात जातीनिहाय जनगणनेच्या विषयाचा समावेश असल्याचे उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी सांगितले..मोदींच्या धाडसाला सलाम : उपमुख्यमंत्री शिंदेसर्वसामान्य नागरिकांत ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे आत्मविश्वास निर्माण झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘केंद्र सरकारचे धोरण, लष्कराचे शौर्य आणि पंतप्रधान मोदी यांनी दाखवलेले धाडस याला आम्ही सलाम करतो,’ असे सांगत शिंदे म्हणाले की, ‘देशाच्या शांततामय वाटचालीला खो घालण्याचा प्रयत्न करत करणाऱ्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून कठोर धडा शिकविण्यात आला आहे. देशाची अखंडता, प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेला ‘रालोआ’ने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.