
ट्रकमधून फेकल्या गायी; 22 किमीपर्यंत तस्करांचा पाठलाग; पाहा चित्तथरारक व्हिडीओ
नवी दिल्ली : आरोपींचा पोलिसांनी केलेला चित्तथरारक पाठलाग आपल्याला बहुतांश वेळेला चित्रपटांमध्ये पहायला मिळतो. आरोपी भरधाव वेगाने गाडी चालवतो आहे आणि पोलिस त्याला गाडी थांबवून पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे दृश्य तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. मात्र, अगदी असंच दृश्य वास्तवात घडल्याचं दिसून आलंय आणि त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी या धावत्या ट्रकमधून गाई-गुरांना फेकून दिलं आहे. हे आरोपी गाई-गुरांचे तस्कर असल्याचा आरोप आहे. गोरक्षकांनी त्यांचा दिल्ली जवळच्या गुरुग्रामपासून सुमारे 22 किमीपर्यंत वेगाने पाठलाग केला. त्यानंतर त्यांना थांबवून अटक करण्यात यश आलंय. गोरक्षकांचा ससेमिरा सोडवण्यासाठी या आरोपींनी चक्क टायर फुटलेल्या आणि नसलेल्या अवस्थेत ट्रक चालवला आहे. त्यांचा पाठलाग करण्यात आल्यानंतर त्यांनी या चालत्या ट्रकमधूनच गाई-गुरांना चक्क फेकून दिलंय.
हेही वाचा: साहेबांच्या घराची रेकी, शारीरिक इजा आणि अस्वच्छ हेतू; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा
नेमकं काय घडलंय?
काल शनिवारी पहाटे गुरुगावच्या सायबर सिटी परिसरात ही धुमश्चक्री झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना पोलिसांनी सांगितलंय की, या गाय तस्करांकडून काही देशी बनावटीच्या बंदुका आणि गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. अधिका-यांनी पुढे सांगितलं की, दिल्ली सीमेवरून गुरुग्राममध्ये प्रवेश करताना या गाय तस्करांनी गाडी थांबवण्यास सांगण्यात आलं. मात्र, ते फरार झाले. त्यामुळे त्यांचा पाठलाग सुरू झाला. काही गोरक्षकांनी त्यांच्या ट्रकचे टायर पंक्चर केलं असतानाही या आरोपींनी वेगाने ट्रक चालवणं सुरुच ठेवलं.
हेही वाचा: आधी भावासाठी जेलमध्ये... आणि आता थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर दावा!
जवळपास 22 किमीपर्यंत त्यांचा पाठलाग करण्यात आला. अनेक ठिकाणी या तस्करांनी गोरक्षकांचं लक्ष विचलित करण्यासाठी धावत्या वाहनातून तस्करी केलेल्या गायी थेट बाहेर फेकल्या. अशोक नावाच्या एका गोरक्षकाने याबाबत माहिती देताना सांगितलं की, "या गो तस्करांना जवळपास 22 किलोमीटरचा पाठलाग करून पकडण्यात आलं. त्यांच्या वाहनातून अवैध बंदुक आणि गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. सर्व गायी फेकून दिल्यानंतर आणि अभूतपूर्व असा पाठलाग केल्यानंतर हे मग गो तस्कर हात जोडताना दिसले. गुरुग्राम पोलिसांच्या एका पथकाने या पाच गो तस्करांना अटक केली आहे.
गुरुग्राममध्ये गाय तस्करांनी अशाप्रकारे दहशत पसरवण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. हरियाणा सरकारने अशा गो तस्करीच्या विरोधात कठोर कायदे केले आहेत आणि गायींच्या संरक्षणासाठी आयोगाची स्थापना देखील केली आहे. परंतु असं असतानाही राज्यात गोवंश तस्करी वाढत आहे.
Web Title: Cattles Thrown Out Of Trucks Chase Smugglers Up To 22 Km Watch The Thrilling Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..