दोघे नको त्या अवस्थेत सापडले; 5व्या मजल्यावरून मारली उडी

पीटीआय
गुरुवार, 16 मे 2019

पती अचानक घरी आल्यानंतर दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले. यामुळे पतीने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. घाबरलेल्या युवकाने घराच्या बाल्कनीमध्ये जाऊन पाचव्या मजल्यावरून उडी मारली.

नवी दिल्ली: विवाहीत महिला व युवक नको त्या अवस्थेत आढळून आल्यानंतर महिलेच्या नवऱयाने बाहेरून दरवाजा बंद केला. घाबरलेल्या युवकाने पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दक्षिण दिल्लीतील तिगडी भागामध्ये ही घटना घडली आहे. त्या भागामध्ये राहणाऱया पंकजचे (वय 29) एका महिलेसोबत (वय 32) विवाहबाह्य संबंध होते. अनेकदा तो महिलेला घरी भेटायला येत असे. मंगळवारी (ता. 14) दुपारी साडेचारच्या सुमारास पंकज महिलेला भेटायला घरी आला होता. यावेळी तिचा पती नोकरीसाठी बाहेर गेला होता. पती अचानक घरी आल्यानंतर दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले. यामुळे पतीने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. घाबरलेल्या पंकजने घराच्या बाल्कनीमध्ये जाऊन पाचव्या मजल्यावरून उडी मारली. यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संबंधित महिलेचा पती तुघलकाबादमध्ये कस्टम क्लियरन्स एजंटसोबत काम करतो. दोन वर्षांपासून महिला व पंकजचे विवाहबाह्य संबंध होते.'

दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजची हत्या आहे की आत्महत्या याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. पंकज व महिलेचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caught With A Married Woman Man Jumped From 5th Floor at delhi