

Supreme Court Petition Filed By CBI Against Kuldeep Sengar Bail
Esakal
उन्नाव बलात्कार प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. हायकोर्टानं माजी आमदार कुलदीप सेंगर याची जन्मठेपेची शिक्षा स्थगिती केलीय. तसंच त्याची जामीनावर सुटका करण्याचा आदेश दिला होता. सीबीआयने या प्रकरणी याचिका दाखल केली असून हायकोर्टाच्या निर्णयात त्रुटी असून पीडितेच्या सुरक्षेला धोका असल्याचं म्हटलंय.