ऑनलाइन बाललैंगिक शोषण : CBI ची महाराष्ट्रासह १४ राज्यांत शोधमोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cbi

ऑनलाइन बाललैंगिक शोषण : CBI ची महाराष्ट्रासह १४ राज्यांत शोधमोहीम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने मंगळवारी ऑनलाइन बाल लैंगिक शोषणाशी (online child sexual abuse) संबंधित आरोपांसंदर्भात 14 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ७६ ठिकाणी शोधमोहीम राबविली आहे. बाल लैंगिक शोषणाशी संबंधित अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रासह आणखी १४ राज्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: नातेवाईक स्वीकारणार मिलिंद तेलतुंबडेचा मृतदेह, वणीमध्ये आज अंत्यसंस्कार

केंद्रीय तपास यंत्रणेने 14 नोव्हेंबरला बालदिनाच्या दिवशी ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि शोषणाशी संबंधित एकूण 83 आरोपींविरुद्ध 23 स्वतंत्र खटले नोंदवले आहेत. त्यानुसार आज आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिशा, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश येथे बाललैंगिक शोषणाशी संबंधित आरोपासंदर्भात चौकशी केली जात आहे.

यंदा जानेवारी महिन्यात सोशल मीडियावर चाईल्ड पॉर्न खरेदी-विक्रीच्या आरोपाखाली दोघांचा सीबीआयने अटक केली होती. नीरज कुमार यादव आणि कुलजीत सिंह माकन, असे आरोपींचे नाव असून नीरज हा इंजिनिअर होता. आरोपी नीरज हा चाईल्ड पॉर्नोग्राफीसह अश्लील क्लीपसाठी इंस्टाग्रामवर जाहिरात करत होता. त्यानंतर नीरजने माकन या आरोपीकडून आक्षेपार्ह डेटा मिळविला आणि तो एका वेबसाईटवर अपलोड केला. त्याठिकाणी पेटीएमद्वारे पैसे भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली, असं सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी सांगितले होते.

loading image
go to top