esakal | बॅनर्जी यांच्या मेव्हणीची सीबीआय चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

CBI

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची मेव्हणी मेनका गंभीर यांची सीबीआयने कोळसा चोरीप्रकरणी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी चौकशी केली. गंभीर यांना यासंदर्भात रविवारी नोटीस बजावण्यात आली होती.

बॅनर्जी यांच्या मेव्हणीची सीबीआय चौकशी

sakal_logo
By
पीटीआय

कोलकाता - तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची मेव्हणी मेनका गंभीर यांची सीबीआयने कोळसा चोरीप्रकरणी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी चौकशी केली. गंभीर यांना यासंदर्भात रविवारी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी त्यांची या प्रकरणातील भूमिका जाणून घेण्यासाठी आज तीन तास चौकशी केली. त्याचप्रमाणे, सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने गंभीर यांच्या आर्थिक खात्याचा तपशीलही जाणून घेतला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेनका गंभीर यांनी यापूर्वी आपण कोलकात्यातील हरिष मुखर्जी रस्त्यावर २३ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत उपलब्ध असू, असे सीबीआयला कळविले होते. अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी ऋतुजा यांच्या मेनका या बहिण आहेत.  बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिषेक बॅनर्जी भाचे आहेत.

मंत्र्यांना बसावं लागतंय आकाशपाळण्यात; डिजिटल इंडियात नेटवर्कसाठी खटाटोप

दिग्गजांवर भ्रष्टाचाराचे आरोप
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सीबीआयने कोळसा चोरी प्रकरणी मांझी उर्फ लाला, ईस्टर्न कोलफिल्ड लि.चे व्यवस्थापकीय संचालक अमित कुमार धर आणि जयेश चंद्र राय आदींविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदविला होता. प.बंगालमधील कुनुस्टोरिया आणि काजोरा परिसरातील ईसीएलच्या दीर्घ मुदतीसाठी भाड्याने घेतलेल्या खाणीतील बेकायदा खाणकाम आणि कोळसा चोरीप्रकरणात लालाचा सहभाग असल्याचा आरोप आहे.   

VIDEO - दुकानदारांचा रस्त्यात राडा; पाणीपुरी खायला आलेल्यांच्या काळजाचं झालं 'पाणी-पाणी'

रुजिरा यांनीच सीबीआयला दिली वेळ
पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबावरील सीबीआयच्या चौकशीवरुन राजकारण तापले आहे. खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा यांनी सीबीआयला पत्र लिहले असून उद्या (ता. २३) चौकशीसाठी आपण निवासस्थानी हजर असू, असे त्यात म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यासह पत्नी रुजिरा आणि मेव्हणी मेनका गंभीर यांची कोळसा गैरव्यवहारप्रकरणी सध्या सीबीआय चौकशी सुरू आहे. यानुसार सीबीआयचे अधिकारी काल रुजिरा यांच्या निवासस्थानी गेले होते. मात्र नोटीस देताना रुजिरा यांच्या निवास्थानी कोणीही नव्हते. आज रुजिरा यांनी नोटिशीला उत्तर देत उद्या सकाळी दक्षिण कोलकता येथील निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उपलब्ध राहू, असे म्हटले आहे. 

Edited By - Prashant Patil