CBI Raid : 17 किलो सोने अन्...; निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाडं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI Raid

CBI Raid : 17 किलो सोने अन्...; निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाडं

CBI Raid : देशात भ्रष्टाचाराविरोधात सीबीआयने मोठ्या प्रमाणात छापेमारी करत आहेत.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

हेही वाचा: Men vs Women : महिलांना पाहताना पुरुष सर्वात पहिले कशाकडे होतात आकर्षित?

याच कारवाई अंतर्गत सीबीआयच्या हाती मोठं घबाड सापडलं आहे. एका सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याच्या घरातील छापेमारीदरम्यान सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे.

सीबीआयने ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एका निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याच्या घरावर केलेल्या कारावाईमध्ये अधिकाऱ्यांना १.५७ कोटी रुपये रोख आणि १७ किलो सोने आणि इतर मालमत्ता सापडली आहे.

हेही वाचा: Eknath Khadse : खडसे नॉटरिचेबल असल्याच्या निव्वळ अफवाच; खरं कारण आलं समोर

निवृत्त अधिकाऱ्याची मालमत्ता पाहून सीबीआयचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. कारवाई करण्यात आलेली व्यक्ती नोव्हेंबर २०२२ मध्ये भारतीय रेल्वेमध्ये मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले आहेत.

एका निवृत्त अधिकाऱ्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आढळून आल्याने कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचेही डोळे चक्रावले आहेत.

हेही वाचा: J P Nadda : नड्डाांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवला; भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर

या अधिकाऱ्याने एवढी मोठी संपत्ती नेमकी कशी कमावली असा प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित होत असून, यामध्ये आणखी काही मालमत्ता हाती लागतीये का याचा शोध सीबीआयकडून घेतला जात आहे.