Odisha Railway Accident: मोठी अपडेट; CBI ने बहनगा स्टेशन केले सील

ओडिशातील बालासोर इथं झालेल्या भीषण रेल्वे अपघातासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
Odisha Railway Accident
Odisha Railway Accident

ओडिशातील बालासोर इथं झालेल्या भीषण रेल्वे अपघातासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. अपघाताची तपास सीबीआयद्वारे केला जात आहे. दरम्यान सीबीआयने बहनगा स्टेशन सील केले आहे. (CBI seals Bahanaga Bazar railway station to probe Odisha accident, no train halt for now )

पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही प्रवासी गाडी किंवा मालवाहू गाडी या स्थानकावर थांबणार नाही. येथून दररोज सुमारे 170 गाड्या जातात. अपघातानंतर 7 गाड्या थांबल्या होत्या. एएनआय या वृत्तसंस्थेने रेल्वे अधिकारी आदित्य कुमार चौधरी यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

Odisha Railway Accident
Odisha Railway Accident : ओडिशात पुन्हा विचित्र रेल्वे अपघात, 6 मजुरांना मालगाडीने चिरडले

रेल्वे अधिकारी चौधरी यांनी सांगितले की, तपासादरम्यान सीबीआयने स्थानकात उपस्थित असलेली सर्व कागदपत्रे तपासली. लॉग बुक, रिले पॅनेल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

सीबीआय आतापर्यंत कधी रेल्वे अपघाताची चौकशी केली नव्हती. अपघातानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक तपासात गाडय़ांची उपस्थिती दर्शवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे आढळले होते. त्यामुळे या अपघातामागे घातपात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Odisha Railway Accident
Odisha Railway Accident: मृतांचे नातेवाईक, जखमींना आत्तापर्यंत किती मदत दिली? रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

ओडिशातील बालासोर इथं झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला तर हजारावर लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये तर गंभीर जखमींना १ लाख रुपये तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com