Odisha Railway Accident: मृतांचे नातेवाईक, जखमींना आत्तापर्यंत किती मदत दिली? रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

त्याचबरोबर दुर्घटनेनंतर आता रेल्वे मार्गावरील परिस्थिती काय आहे? याची माहिती देखील त्यांनी दिली.
Odisha Train Accident
Odisha Train Accident

Odisha Railway Accident: ओडिशातील बालासोर इथं झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला तर हजारावर लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये तर गंभीर जखमींना १ लाख रुपये तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली होती.

तसेच पंतप्रधानांनी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील मदत जाहीर केली होती. (Odisha Railway Accident how much help has been given to victims so far Railway officials gives info)

पण या अपघाताला आता चार दिवस उलटले आहेत. पण जाहीर झालेल्या मदतीपैकी किती मदत प्रत्यक्षात पीडितांना मिळाली आहे. याबाबत दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. सीपीआरओ आदित्य कुमार चौधरी म्हणाले, आत्तापर्यंत ५३१ लोकांना मदत देण्यात आली आहे, यामध्ये १५.६ कोटी रुपयांचं वाटप झालं आहे. याचं ब्रेकअप केलं तर यामध्ये किरकोळ जखमी लोक ३०३ आहेत. तसेच १०९ लोक गंभीर जखमी तर ११९ मृतांच्या नातेवाईकांना आम्ही मदत देऊ केली आहे. याची एकूण रक्कम आहे १५.६ कोटी रुपये. (Odisha Accident Latest News)

Odisha Train Accident
Beer Yoga: बिअर पीत केली योगासनं! 'या' ठिकाणी साजरा झाला अजब सोहळा; Video Viral

आम्ही मीडियाच्या माध्यमातून हे आवाहन करतो की ज्यांना मदत लागू होत आहे. म्हणजेच जे प्रवाशी अपघातग्रस्त रेल्वे गाडीतून प्रवास करताना दुर्घटनेत त्यांना इजा झाली, ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांनी आम्ही जे हेल्पलाईन क्रमांक प्रसारित केले आहेत तसेच मदतीचे बुथ विविध ठिकाणी तैनात केले आहेत.

त्याठिकाणी यांनी संपर्क साधावा त्यानंतर आमची टीम तिथं तयार आहे, त्यांना जरूर मदत करण्यात येईल. त्यामुळं ज्यांना कोणाला या मदतीची गरज आहे, त्यांनी आमच्या हेल्पडेस्कशी संपर्क करावा. आम्ही तुमची मदत करु, तुम्ही जिथं असाल तिथं येऊन आम्ही मदत करु. (latest marathi News)

Odisha Train Accident
Raj Thackeray: महाराष्ट्र कशासाठी जगवलात? राज ठाकरे जेव्हा शिवरायांना फोन कॉल करतात

रेल्वे मार्गावरील परिस्थिती कशी?

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे मार्गावर साडेतीन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामध्ये महत्वाचं दुरुस्तीचं काम करण्यात आलं. यानंतर रेल्वेचा वेगही वाढवण्यात येणार आहे. त्यानंतर डाऊन लाईन आहे त्याचा स्पीडही वाढवण्यात येईल. त्यामुळं वेगवेगळ्या फेजमध्ये काम सुरु आहे. त्याठिकाणी बरेच कामगार काम करत आहेत, इतर स्टाफही काम करत आहे. त्यामुळं रेल्वे गाड्यांचा वेग कमी ठेवण्यात आला आहे. कारण त्यांना काही दुखापत होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com