esakal | CBI पथक देशमुखांच्या वकिलाला घेऊन गेलं दिल्लीला
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

CBI पथक देशमुखांच्या वकिलाला घेऊन गेलं दिल्लीला

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांचे वकिल आनंद दागा (anand daga) यांना काल रात्री सीबीआयने अटक केली. सीबीआयचे (cbi) पथक त्यांना दिल्लीला (delhi) घेऊन गेलं आहे. ट्रान्जिस्ट रिमांडवर दोघांना नेण्यात आलं आहे. दिल्लीतील सीबीआय न्यायालयात दोघांना हजर केलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील वसुली प्रकरणाच्या चौकशी अहवालात छेडछाड केल्याप्रकरणी एका व्यक्तीला CBIनं बुधवारी ताब्यात घेतलं होतं. ही व्यक्ती देशमुख यांच्या लीगल टीममधील होती. मुंबई विमानतळाबाहेरुन या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं होतं.

हेही वाचा: आर्थिक संकट, पण तालिबान गडगंज श्रीमंत, कुठून येतोय इतका पैसा?

अनिल देशमुख यांना सीबीआयनं क्लीनचीट दिल्याच्या बातम्या २९ ऑगस्ट रोजी माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. सीबीआय चौकशीचा हा प्राथमिक अहवाल लीक झाल्यानं त्यावरुन बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या चौकशी अहवालात असं म्हटलं होतं की, "अनिल देशमुख यांनी कुठलाही दखलपात्र गुन्हा केलेला नाही." यासंदर्भात क्लीनचीटच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सीबीआयनं याचा इन्कार केला होता. तसेच याची चौकशी सुरु केली होती. याप्रकरणाच्या चौकशीअंती हे दिसून आलं की, देशमुख यांच्या लीगल टीमने सीबीआयच्या काही कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता.

loading image
go to top