esakal | आर्थिक संकट, पण तालिबान गडगंज श्रीमंत, कुठून येतोय इतका पैसा?
sakal

बोलून बातमी शोधा

kabul airport

आर्थिक संकट, पण तालिबान गडगंज श्रीमंत, कुठून येतोय इतका पैसा?

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: अफगाणिस्तानची (afganistan) सूत्र तालिबानच्या (taliban) हाती आली असून लवकरच ते नव्या सरकारची घोषणा करणार आहेत. तालिबान सत्तेवर येणार हे स्पष्ट झाल्यानंतर अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती अधिक बिकट झाली आहे. अफगाणिस्तानात बँकांबाहेर लोकांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तान आर्थिक गर्तेत फसत चालल्याचं चित्र दिसत असलं, तरी प्रत्यक्षात तालिबानकडे मात्र बराच पैसा आहे.

"ओपियम, हेरॉईनची तस्करी तसचं आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या भागांमध्ये कराच्या रुपाने तालिबान वर्षाला दीड अब्ज डॉलरपेक्षा जास्त कमाई करतोय" असं पाकिस्तान स्थित फ्रंटियर पोस्टच्या विश्लेषणातून समोर आलय. त्याशिवाय पाकिस्तान आणि आखाती देशांमधुन पैसा मिळतोय. संयुक्त राष्ट्राच्या मे महिन्यातील अहवालानुसार, तालिबानचे वार्षिक उत्पन्न ३० कोटी डॉलर ते १.६ अब्ज डॉलर दरम्यान आहे.

हेही वाचा: श्रेयसला कमाई विचारणारी मायरा एका एपिसोडमधून किती कमावते?

मागच्यावर्षी एकट्या करातून त्यांनी १६ कोटींची कमाई केली. अफगाणिस्तानात ओपियमची शेती केली जात नाही, असं पुन्हा एकदा तालिबानने म्हटलं आहे. फ्रंटियर पोस्टच्या विश्लेषणानुसार, जगात अफगाणिस्तानातच ओपियमचे सर्वाधिक उत्पादन केले जाते. ड्रग्जच्या व्यवहारातून तालिबानला वर्षाला ४० कोटी डॉलर मिळतात.

हेही वाचा: आता करा 'गुगल पे'वरुनच एफडी...पण कोणत्या बँकेत? जाणून घ्या

ड्रग्ज हेच एकमेव तालिबानच्या कमाईचं साधन राहणार नाहीय. सरकार स्थापन केल्यानंतर अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी तालिबान उत्पन्नाच्या अन्य स्त्रोतांचा सुद्धा शोध घेईल. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अंदाजानुसार, अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर खनिज आहेत. त्यातून सुद्धा तालिबानला कमाई करता येईल. तांबा, बॉक्साईट, मार्बल, लिथियम आणि सोन्याचे साठे अफगाणिस्तानात आहेत.

loading image
go to top