esakal | सीबीएससी 10 वीची परीक्षा रद्द; नियमीत अभ्यासाचा फायदा तर ट्रिक्स वापरणाऱ्यांना फटका
sakal

बोलून बातमी शोधा

CBSC Exams

सीबीएससी 10 वीची परीक्षा रद्द; नियमीत अभ्यासाचा फायदा तर ट्रिक्स वापरणाऱ्यांना फटका

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : केंद्रीय शिक्षण विभागाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएससी) इयत्ता १० वीची परीक्षा रद्द केल्याने ज्या विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर सिन्सीयरली अभ्यास केला आहे अशाच विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ निकषांच्या आधार चांगले गुण मिळू शकतील, तर जे विद्यार्थी परीक्षा तोंडावर आलेली असताना घोकंपट्टी करून, ट्रिक्स वापरून गुण मिळविण्याच्या तयारीत होते अशांना फटका बसण्याची शक्यता आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सीबीएससी बोर्डाची इयत्ता १२वीची परीक्षा पुढे ढकलली आहे आणि इयत्ता १०वीची रद्द केली आहे. इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ‘सीबीएससी’ मंडळाने तयार केलेल्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. या निकालावर असमाधानी असणाऱ्या विद्यार्थ्यांची स्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वीचा अभ्यास वर्षभर प्रामाणिकपणे केला आहे. अंतर्गत परीक्षांना चांगले गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांना हे या वस्तुनिष्ठ निकषांची पूर्तता चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येणार असल्याने अशा विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळू शकतील पण जे विद्यार्थी केवळ परीक्षेच्या दोन तीन महिने घोकंपट्टी व इतर ट्रिक्स वापरून चांगले गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात त्यांना यामध्ये चांगले गुण मिळतीलच असे नाही.

हेही वाचा: तीरथसिंह रावत पुन्हा बरळले; 'कुंभमेळ्यामुळं नाही, मरकजमुळं कोरोना पसरेल'

‘‘जे विद्यार्थी गेले वर्षभर परिक्षेची सिन्सियरली तयारी करत होते अशांना या निर्णयाचा त्रास होऊ शकतो. पण सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची वर्षभराची कामगिरी कशी आहे, गृहपाठ, कार्यपत्रक यासह इतर सबमीशन्स पूर्ण केले आहेत. अंतर्गत परीक्षेत चांगले गुण मिळवले अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. पण केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवायचे म्हणून अभ्यास केला आहे अशा विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनामध्ये कमी गुण मिळतील.
- मिलिंद नाईक, प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी

‘‘कोरोना वाढत असताना आता परीक्षा रद्द केल्याने चांगले झाले. गेले वर्षभर शाळेमध्ये मला जो गृहपाठ किंवा सबमीशन दिले आहेत ते त्याचवेळी पूर्ण केले आहेत, अंतर्गत परीक्षेतही चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे १०वीचा निकाल चांगला लागेल.’’
- ऋग्वेद कुलकर्णी, विद्यार्थी

नियमावलीची प्रतिक्षा
इयत्ता १०वीचा निकाल वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. या निकषांमध्ये कोणत्या नियमांचा समावेश असणार आहे? पद्धत कशी असणार आहे हे स्पष्ट करण्यासाठी सीबीएससीकडून नियमावलीची प्रतिक्षा असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.

महाराष्ट्रातील विद्यार्थी संख्या (२०२०)

  • इयत्ता १०वी - ७३,४८४

  • इयत्ता १२वी -२१, २८५