CBSE 10th Result : 100 टक्के गुण मिळवत दिया नामदेव ठरली नॅशनल टॉपर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diya Namdev_CBSE topper
CBSE 10th Result : 100 टक्के गुण मिळवत दिया नामदेव ठरली नॅशनल टॉपर

CBSE 10th Result : 100 टक्के गुण मिळवत दिया नामदेव ठरली नॅशनल टॉपर

नवी दिल्ली : सीबीएसईचा दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील दिया नामदेव या विद्यार्थीनीनं शंभर टक्के गुण मिळवत राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान पटकावलं आहे. तिच्या या यशासाठी जिल्ह्यात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (CBSE 10th Result Diya Namdev became National Topper by scoring 100 percent marks)

दिया नामदेव ही शामली येथील स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी आहे. तिनं ५०० पैकी ५०० गुण मिळवले आहेत. म्हणजेच सर्व विषयांमध्ये तिने पैकीच्या पैकी गुण मिळवले असून एकही गुण तिनं गमावलेला नाही. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, सीबीएससीचा बारावीचा निकालही आज जाहीर झाला. या परीक्षेत सिल्व्हर बेल्स पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी अपूर्वा तायल आणि बीएसएम स्कूलची विद्यार्थीनी प्रियांशी देशवाल यांनी संयुक्तरित्या ९९.६० टक्के गुण मिळवले आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यींनींनी जिल्ह्यांत सर्वाधिक गुण मिळवले आहेत.

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल रखडल्यानं महाराष्ट्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. कारण राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल लागूनही पंधरा दिवसांहून अधिक काळ गेला आहे. पण आता सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाची प्रक्रियेला वेग येणार आहे.

टॅग्स :CBSEDesh newsCBSE Results