
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) पुढील वर्षी म्हणजेच २०२६ पासून एका वर्षात दोन बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याला मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत हा एक मसुदा धोरण होता. परंतु आता तो निश्चित झाला आहे. बुधवार, २५ जून रोजी सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना याबद्दल माहिती दिली. हा नियम सध्या फक्त सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेवर लागू केला जात आहे.=