CBSE Board Exam 2021:कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी CBSE ची मोठी घोषणा

Students
Students

CBSE Board Exam 2021: देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहेत. अशात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने Central Board of Secondary Education (CBSE) कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशा विद्यार्थ्यांना लॅबोरेटरीमधील प्रॅक्टिकल परीक्षेबाबत चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. यासंदर्भात नोटिस जारी करत CBSEने म्हटलंय की, कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिल परीक्षा पुढे ढकलल्या जातील आणि एप्रिलमध्ये घेण्यात येतील किंवा लेखी परीक्षा संपल्यानंतर त्या घेण्यात येतील.   केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या या नव्या निर्णयामुळे कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी CBSE च्या निर्णयाचं स्वागत केलंय. 

कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांनी विलगीकरणात राहुन आराम करण्याचा सल्ला CBSE ने दिला आहे. विद्यार्थ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल आणि तो प्रॅक्टिल परीक्षा देण्यास असमर्थ असेल, तर त्याला पुन्हाही परीक्षा देता येईल. एप्रिल महिन्यात किंवा मुख्य परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्याला प्रॅक्टिल परीक्षा देता येईल. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक शाळांनी चिंता व्यक्त केली होती. सध्या सीबीएसईच्या बोर्डाच्या प्रॅक्टिल परीक्षा सुरु आहेत. 

कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्कूल प्रशासन आणि विद्यार्थी दडपणाखाली आहेत. शिवाय कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षेला उनुपस्थिती लागण्याची शक्यता होती. अशावेळी सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पालकांमध्येही या निर्णयामुळे समाधानाची भावना आहे. 

नुकतेच सीबीएसईने १० वी आणि १२ वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा दिली होती. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे अनेक पालकांनी शहर सोडलं होतं. त्यामुळे त्यांनी परीक्षेला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती. हे सर्व लक्षात येऊन निर्णय घेण्यात आल्याचं सीबीएसई बोर्डाने म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com