CBSE - दहावी, बारावी बोर्डाचे वेळापत्रक जाहीर; करा डाउनलोड

टीम ई सकाळ
Tuesday, 2 February 2021

CBSE Board Exam Date Sheet 2021 : सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी डेटशीट प्रसिद्ध केली आहे. 

नवी दिल्ली - CBSE Board Exam Date Sheet 2021 : सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी डेटशीट प्रसिद्ध केली आहे. रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं की, महत्त्वाच्या विषयांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळेल याचा प्रयत्न केला आहे. 

सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेची डेटशीट पाहण्यासाठी बोर्डाच्या अधिकृत cbse.gov.in या संकतेस्थळाला भेट द्या. त्यावरून डेटशीट डाउनलोड करता येते. वेबसाइटवर गेल्यानंतर अपडेट सेक्शनमध्ये डेटशीटवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा क्लास सिलेक्ट करा. त्यानंत तुमची डेटशीटची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

शिक्षण मंत्र्यांनी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांची तारीख आधीच जाहीर केली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 4 मे ते 10 जून या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. परीक्षेच्या तारखांची घोषणा जाहीर केल्यानंतर आता वेळापत्रकही प्रसिद्ध केलं आहे. 

हे वाचा - SSC Recruitment : १०वी, १२वी पास उमेदवारांनो, सरकारी नोकरी पाहतेय तुमची वाट!

सीबीएसईने गणित, सामाजिक विज्ञान, विज्ञान यांसह इतर विषयांसाठी दहावीचे नमुन्याचे पेपर वेबसाइटवर जाहीर केले आहेत. यंदा बोर्ड परीक्षेसाठी मंडळाने दहावीचा अभ्यासक्रम तब्बल 30 टक्के कमी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिघडलेलं शेड्युल आणि त्यात अभ्यासक्रम पूर्ण करणं शक्य नसल्यानं हा निर्णय घेतला गेला. ऑनलाइन वर्ग सुरु असले तर कठीण संकल्पना समजण्यासाठी अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी अभ्यासक्रम वगळताना घेण्यात आली आहे.

 इंडियन ऑइलमध्ये इंजिनिअर पदासाठी भरती; पगार १.०५ लाख रुपये!​ 

परीक्षा होण्याआधीच निकालाबाबतही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. पोखरियाल म्हणाले होते की, बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर वेळेत पेपर तपासले जातील. तसंच निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं होतं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cbse board exam class 10th and 12th datesheet download