सोनिया गांधींनी आक्षेप घेतलेला दहावीच्या प्रश्नपत्रिकेतील 'तो' उतारा अखेर हटवला

सोनिया गांधींनी आक्षेप घेतलेला दहावीच्या प्रश्नपत्रिकेतील 'तो' उतारा अखेर हटवला

नवी दिल्ली : CBSE च्या इयत्ता दहावीच्या इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका वादग्रस्त ठरली होती. या प्रश्नपत्रिकेतील वादग्रस्त प्रश्न (CBSE 10th English Question) हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या वादग्रस्त प्रश्नाला रद्द ठरवत त्याचे गुण विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय CBSE ने घेतला आहे. याबाबतचा निर्णय CBSE ने आपल्या वेबसाईटवर cbse.gov.in वर एक नोटीस जाहीर केली आहे. CBSE च्या (CBSE Board) या निर्णयामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाहीये, याऊलट विद्यार्थ्यांना यातून दिलासा मिळणार आहे. बोर्डाकडून आता त्या प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांना संपूर्ण गुण दिले जाणार आहेत. (CBSE 10th English Controversial Question) )

सोनिया गांधींनी आक्षेप घेतलेला दहावीच्या प्रश्नपत्रिकेतील 'तो' उतारा अखेर हटवला
मुंबई| अंंधेरीत 10 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, 5 जण जखमी

काय होता उताऱ्यावरील आक्षेप?

या प्रश्नपत्रिकेतील उताऱ्यामध्ये लिंग आधारित पुराणमतवादी मतांना अधिक चालना देण्याचा आरोप केला जात होता. तसेच महिलांचा अपमान होईल, अशी विधाने या उताऱ्यात होती, असाही आरोप होत होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी लोकसभेच्या शून्य प्रहरामध्ये शून्यकाल (Lok Sabha Zero Hour) याबाबत चर्चा करत आक्षेप नोंदवला होता. सोबतच CBSE कडून याबाबत क्षमेची मागणी केली होती. सोनिया गांधी यांच्याशिवाय काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि शिवसेनेच्या खासदार प्रियका चतुर्वेदी यांनी आक्षेप घेतला होता. या उताऱ्यामध्ये मुलांच्या आणि नोकरांच्या बेशिस्तपणाचे कारण 'पत्नी पतीचे ऐकत नाही', अशा स्वरुपाचे एक विधान यामध्ये होतं.

सोनिया गांधींनी आक्षेप घेतलेला दहावीच्या प्रश्नपत्रिकेतील 'तो' उतारा अखेर हटवला
छत्रपती शिवाजी महाराजांना काशीमधून प्रेरणा मिळाली होती - PM मोदी

CBSE ने आपल्या नोटीशीमध्ये म्हटलंय की, 'क्लास 10 टर्म 1 ची 2021ची इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एक उतारा बोर्डाच्या गाईडलाईन्सनुसार सेट करण्यात आला नव्हता. याबाबत मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर बोर्डाने हा विषय तज्ज्ञांकडे सोपवला. त्यांनी दिलेल्या शिफारसीनंतर उतारा नंबर 1 आणि त्याच्याशी निगडीत प्रश्नांना रद्द ठरवण्यात आलं आहे.

बोर्डाने माहिती दिलीय की, 'क्लास 10 इंग्लिश क्वेश्चन पेपर सिरीज JSK/1' मध्ये पॅसेज नंबर 1 चे सर्व प्रश्न हटवण्यात आले आहेत. मात्र परीक्षा आणि मूल्यांकनामध्ये समानता राखण्यासाठी सर्व राज्याच्या विद्यार्थ्यांना यासाठीचे मार्क्स पूर्ण देण्यात येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com