CBSE OSM controversy latest news
esakal
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) मध्ये मोठ्या प्रशासकीय उलथापालथीला सुरुवात झाली (CBSE OSM controversy) आहे. ऑन-स्क्रीन मार्किंग (ओएसएम) सेवांच्या खरेदी प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंह आणि मंडळाचे सचिव यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, सरकारने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.