सीबीएसईच्या परीक्षा शुल्कात वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

सीबीएसई मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ केली आहे. दहावी आणि बारावी परीक्षेसाठी एससी आणि एसटी विद्यार्थ्यांचे शुल्क 50 रुपयांवरून 1200 रुपये करण्यात आले आहे. तर, सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे शुल्क दुप्पट झाले आहे.

नवी दिल्ली - सीबीएसई मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ केली आहे. दहावी आणि बारावी परीक्षेसाठी एससी आणि एसटी विद्यार्थ्यांचे शुल्क 50 रुपयांवरून 1200 रुपये करण्यात आले आहे. तर, सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे शुल्क दुप्पट झाले आहे.

साधारण विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सुमारे 1500 रुपये राहील. नववीत असतानाच दहावी परीक्षेसाठी, तर अकरावीत असताना बारावी परीक्षेची नोंदणी केली जाते. परीक्षा शुल्कातील बदलाबाबत मागील आठवड्यात शाळांना सूचना देण्यात आल्याचे मंडळाने स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBSE SSC HSC Exam Fee Increase