CBSE Three Language Policy
esakal
नवी दिल्ली : सीबीएसईच्या (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. १७) महत्त्वाची सूचना केली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी २०२७-२८ या शैक्षणिक सत्रापासून करण्याचा विचार करावा, असे न्यायालयाने सीबीएसईला सुचवले. नवीन भाषाविषयक नियमांशी विद्यार्थ्यांना कोणताही अनावश्यक त्रास न होता जुळवून घेता यावे, या उद्देशाने हा विलंब करण्याची सूचना करण्यात आली.