What Is the CBSE Three Language Formula?
esakal
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शाळांमधील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला (CBSE three language policy) आहे. सध्याच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांवर त्रिभाषा सूत्राची सक्तीने अंमलबजावणी करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच सध्याच्या सहावीतील विद्यार्थ्यांनाही या नियमातून सवलत देण्यात आली आहे.