esakal | CBSE १० वी निकाल 2021: लवकरच cbseresults.nic.in वर जाहीर होणार तारीख
sakal

बोलून बातमी शोधा

cet exam

CBSE १० वी निकाल 2021: लवकरच cbseresults.nic.in वर जाहीर होणार तारीख

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: CBSE बोर्डाकडून लवकरच १० वी इयत्तेच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. CBSE च्या अधिकृत वेबसाइटवर २०२१ वर्षाच्या १० वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. देशभरातून एकूण १८ लाख विद्यार्थी (students) निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. CBSE च्या इतिहासात पहिल्यांदाच परिक्षा (exam) न घेता निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. परीक्षेच्यावेळी कोरोनाची दुसरी लाट तीव्र असल्यामुळे अनेक राज्य बोर्ड (state board) आणि CBSE सह अन्य राष्ट्रीय बोर्डांना परीक्षेचा निर्णय रद्द करावा लागला. (CBSE to declare the result of regular students as per the policy approved by the Supreme Court dmp82)

सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या धोरणानुसार, CBSE बोर्ड नियमित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत, पर्यायी पद्धतीने विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. गेल्यावर्षी २०२० मध्ये CBSE बोर्डाच्या परिक्षेचे काही पेपर झाले. त्यानंतर कोविड आणि लॉकडाउनमुळे परिक्षा थांबवावी लागली. त्यावर्षी ९९.२३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

हेही वाचा: मुंबईत 'रेड अलर्ट'; चेंबूर, सायनमध्ये पाणी साठायला सुरूवात

खासगी विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची परिक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान होईल, असे CBSE कडून बुधवारी सांगण्यात आले. यावर्षी नियमित विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करण्यात आली. अन्य पर्यायी पद्धतीने यावर्षी गुणदान करण्यात येईल. विद्यार्थ्यांची गतवर्षातील कामगिरी लक्षात घेण्यात येणार आहे. खासगी विद्यार्थ्यांच्या बाबतीत, शाळा किंवा CBSE कडे कुठलेही रेकॉर्ड नाहीय. त्यामुळे सध्याच्या धोरणानुसार, या विद्यार्थ्यांना गुण देता येणार नाहीत, असे बोर्डाकडून सांगण्यात आले.

loading image