CCTV मध्ये कैद झाला सायरस मिस्त्री यांच्या अपघातापूर्वीचा व्हिडिओ

चारोटी नाका येथील पुलावरील रस्त्याच्या दुभाजकाला ही गाडी धडकली
CCTV मध्ये कैद झाला सायरस मिस्त्री यांच्या अपघातापूर्वीचा व्हिडिओ

सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतर, रविवारी दुपारी अपघाताच्या काही क्षण आधीच्या एका व्हिडिओ CCTV मध्ये कैद झाला आहे.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री, टाटा समूहातील माजी स्वतंत्र संचालक डॅरियस पांडोले, त्यांची पत्नी अनाहिता पांडोळे आणि भाऊ जहांगीर पांडोळे यांच्यासह मर्सिडीज GLC स्पोर्ट्स कारमद्धे प्रवास करत होते.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दापचरी चेकपॉईंटवरून जाणाऱ्या सूर्या नदीवरील पुलावर अपघात होण्याच्या 20 मिनिटे आधी गाडी एका चेकपॉईंटकडे वेगाने जात असल्याचे दिसते. मुंबईपासून सुमारे 135 किमी अंतरावर असलेल्या चारोटी नाका येथील पुलावरील रस्त्याच्या दुभाजकाला ही गाडी धडकली.

मेकॅनिकच्या दुकानात काम करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने हा अपघात पाहिला. मोठा आवाज ऐकून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मुंबईतील स्त्रीरोग तज्ज्ञ अनाहिता पांडोळे या गाडी चालवत होत्या. चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले असावे आणि रस्त्याच्या दुभाजकाला धडकले असावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

याशिवाय मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पुलावर तीन पदरी रस्ता अचानक दोन लेनमध्ये बदलतो, हे देखील अपघाताचे एक कारण असल्याचे मानले जात आहे.

मागच्या सीटवर असलेले सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता.

अनाहिता पांडोळे (वय 55) आणि समोर बसलेले दारियस पांडोळे (वय 60) हे दोघे गंभीर जखमी झाले.

पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेल्या फुटेजचे विश्लेषण करत आहेत आणि कारची कोणतीही यांत्रिक समस्या आहे का याचा तपास केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com