
नवी दिल्ली : पाकिस्तानला भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून दिल्यानंतर दहा मे रोजी झालेला शस्त्रसंधी १८ मे, म्हणजे आजपर्यंतच असल्याची चर्चा असताना भारतीय लष्कराने मात्र अशी कोणतीही कालमर्यादा निश्चित केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. शस्त्रसंधीची मुदत आज संपल्यानंतर पुन्हा संघर्ष होण्याबाबतच्या चर्चांना लष्कराच्या या खुलाशाने पूर्णविराम मिळाला आहे. तसेच, पाकिस्तानच्या लष्करी कारवाईविषयक महासंचालकांशी (डीजीएमओ) पुढील चर्चेची वेळ अद्याप निश्चित ठरली नसल्याचे लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले.