Maiden Pharma : 66 बालकांचा जीव घेणारे कफ सिरप 'स्टँडर्ड'; केंद्राकडून क्लीनचीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maiden Pharma

Maiden Pharma : 66 बालकांचा जीव घेणारे कफ सिरप 'स्टँडर्ड'; केंद्राकडून क्लीनचीट

नवी दिल्ली : गांबिया इथं ही कफ सिरप घेतल्यानं ६६ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. हे कफ सिरप भारतीय कंपनी असलेल्या हरयाणाच्या मेडन फार्मानं तयार केले होते.

हे सर्व सिरप उच्च दर्जाचे असल्याचं चाचणीतून समोर आल्याचा दावा केंद्र सरकारनं केला आहे. यामुळं Maiden Pharma कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. (Center denied allegations says Maiden Pharma Cough Syrups are Standard Quality)

केंद्रानं म्हटलं की, मेडेन फार्माच्या चार कफ सिरप ज्यांच्यामुळं गॅम्बियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे, हे सर्व कफ सिरप 'मानक दर्जाचे' असल्याचं स्पष्ट झालं आहे. या सिरपचे कन्ट्रोल सॅम्पल चाचणी आणि विश्लेषणासाठी चंदीगडमधील रिजनल ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरीकडे (RDTL) पाठवण्यात आले होते. या लॅबनं याच्या अहवालात हे सॅम्पल मानक दर्जाचं असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय रसायन आणि खते मंत्री भगवंत खुबा यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

टॅग्स :Desh newshealth