केंद्राच्या PMMVY योजनेचा विस्तार; दुसरे मुलं झाले तरी मिळणार लाभ

1 एप्रिलपासून नव्याने विस्तार केलेली योजना लागू केली जाणार आहे.
Pregnant Women
Pregnant Women File Photo
Updated on

नवी दिल्ली : केंदाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत (PMMVY) विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोशन 2.0 यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिलांना दुसरे मुलं झाले तरी या योजनेचा लाभ मिळणार असून, यासाठी एक अट घालण्यात आली असून, त्याच्या पूर्ततेनंतरच याचा लाभ मिळणार आहे. 1 एप्रिलपासून नव्याने विस्तार केलेली योजना लागू केली जाणार आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त प्रकाशित केले आहे. (Center Expand PMMVY Scheme)

Pregnant Women
भारतीयांना परत आणण्यात कुठलीही कसर सोडणार नाही, PM मोदींचं प्रचारसभेत वक्तव्य

योजनेत कोणते फायदे मिळतात

या योजनेत गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांच्या बँक आणि पोस्ट ऑफिसच्या खात्यावर तीन हप्त्यांमध्ये रोख पैसे पाठविले जातात. दरम्यान, ही योजना अधिक सुलभ करण्यात आली असून, यातील रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाणार असून, या योजनेचा लाभ मिळावा यासाठी दुसरी मुलगीच असली पाहिजे अशी अट टाकण्यात आली आहे.

Pregnant Women
LIC चा आयपीओ लांबणीवर पडण्याची शक्यता; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत

या योजनेत पूर्वी पात्र गर्भवती किंवा स्तनदा महिलांचा समावेश करण्यात आला होता. ब्यूरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BRR&D) आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या महिला सुरक्षा कार्यक्रमात इंदेवर पांडे यांनी याची माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com