LIC चा आयपीओ लांबणीवर पडण्याची शक्यता; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत

रशिया आणि युक्रेनयुद्धाचा परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून आला आहे.
LIC IPO
LIC IPOsakal media

नवी दिल्ली : देशात सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेला LIC चा आयपीओ बाजारात दाखल होण्याच्या तारखेत बदल केला जाण्याची शक्यात आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman )यांनी एक एका मुलाखतीदरम्यान, एलआयसी आयपीओच्या तारखेत बदल होऊ शकतात असे संकेत दिले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलआयसीच्या आयपीओबाबत पुन्हा एकदा फेरविचार केला जाऊ शकतो, असे सीतारमण यांनी म्हटले आहे. त्यामुळे आतुरतेने वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. (LIC IPO Latest News In Marathi)

LIC IPO
अजित पवारांच्या शब्दाला काही किंमत नाही, आधिवेशनाआधी फडणवीसांची टीका

सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War Effect On Share Market) सुरू असलेल्या युद्ध संकटामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो असे सांगितले जात आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची ठिणगी पडल्यानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते. याचा फटका एलआयसीच्या आयपीओलादेखील बसू शकतो त्यामुळे याची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LIC IPO
'दुनिया बेशरम कहती है तो क्या...' शिल्पाने अखेर केलं मान्य

दरम्यान, राजकीय आणि आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे एलआयसीचे चेअरमन कुमार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र, रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतर याचा परिणाम शेअर मार्केटवरदेखील पडला असून, याचा फटका एलआयसीच्या आयपीओवरदेखील होऊ शकतो त्यामुळे याच्या लॉन्चिंगची तारीख पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com