esakal | लहान मुलांसाठी केंद्राकडून कोरोना गाईडलाईन्स जाहीर; रेमडेसिव्हिर नको, वॉक टेस्टचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

children

देशात कोरोना महामारीचा प्रकोप कमी होत आहे. असे असले तरी तिसरी लाट येण्याच्या दृष्टीने तयार राहण्याची आवश्यकता आहे.

मुलांसाठी गाईडलाईन्स जाहीर; रेमडेसिव्हिर न वापरण्याचा सल्ला

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात कोरोना महामारीचा प्रकोप कमी होत आहे. असे असले तरी तिसरी लाट येण्याच्या दृष्टीने तयार राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरु शकते, असा दावा तज्ज्ञ करत आहेत. त्यामुळे सरकार याबाबत खबरदारी घेताना दिसत आहे. केंद्र सरकारने संक्रमित लहान मुलांच्या उपचारासाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्यात सरकारनं म्हटलंय की मुलांना स्टेरॉईड देणं टाळायला हवं. तसेच मुलांच्या शारीरिक क्षमतांचे आकलन करण्यासाठी 6 मिनिट चालण्याच्या सल्ला दिला आहे. गाईडलाईनमध्ये रेमडेसिव्हिरच्या वापर टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. (center issued corona guideline for children do not use remdesivir)

स्टेरॉईड फक्त गंभीर रुग्णांना दिले जावे आणि रेमडेसिव्हिरच्या वापरापासून दूर राहावे. रेमडेसिव्हिर आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेले औषध आहे. रेमडेसिव्हिर संबंधी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर याचा प्रभाव आणि सुरक्षा याचा डेटा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे ज्या मुलांमध्ये गंभीर स्वरुपाचा अस्थमा आहे, त्यांनी याचा वापर पूर्णपणे टाळावा.

हेही वाचा: अग्रलेख : दिल्लीवारीचे फलित काय?

6 मिनिट वॉक

केंद्र सरकारने म्हटलं की, लहान मुलांच्या शारीरिक क्षमतांची तपासणी करण्यासाठी 6 मिनिटांच्या वॉल्कचा प्रयोग करा, जेणेकरुन त्यांच्यात कार्डियो-पल्मोनरी एक्सरसाइज टॉलरेंस केला जाईल. मुलांच्या बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यांना सलग 6 मिनिट चालण्यास सांगितलं आहे. यादरम्यान त्यांची ऑक्सिजन पातळी 94 टक्क्यांची खाली जाते किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला तर मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जावे.

हेही वाचा: मुंबईत मालाडमध्ये इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, लहान मुलांसंबंधी सीटी स्कॅनचा सल्ला देण्यात आला आहे. असंही म्हणण्यात आलं की, हाय रिजॉल्युशन सीटी स्कॅनचा वापर विचारपूर्वक केला जावा. ज्यांना गंभीर स्वरुपातील अस्थमा आहे, त्यांना अशी टेस्ट न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केंद्र सरकारने गाईडलाईन्समध्ये सांगितलंय की, जर मुलांमध्ये कोरोनाचा आजार गंभीर झाला तर त्यांची ऑक्सिजन थेरेपी तत्काळ सुरु केली जावी.

loading image