

CJP Protest
Esakal
मुंबई : दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीहल्ल्याचे पडसाद देशभरात उमटले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात शिक्षणासंदर्भात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांवरही आता नव्याने चर्चा होऊन सरकारला विविध प्रश्न विचारून ते सोडवले पाहिजेत, याविषयी राज्यातील तज्ज्ञांनी मत नोंदवले.