

Sugar Price hike
esakal
Crackdown on Hoarding: सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. देशातील काही शहरांमध्ये साखरेचे दर प्रतिकिलो ७० रुपयांपर्यंत पोहोचले असल्याची माहिती आहे. मागील एका महिन्यात सरासरी भाव ४८.१८ रुपयांवरून ५५.७० रुपये प्रति किलोवर गेले आहेत.