Gallantry Awards 2026 List
ESakal
देश
प्रजासत्ताक दिनापूर्वी शौर्याचा गौरव! ९८२ वीरांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर; यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
Gallantry Awards 2026 List Announcement: २०२६ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, पोलिस, अग्निशमन, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या ९८२ कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत.
२०२६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस, अग्निशमन विभाग, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण (HG&CD) आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण ९८२ कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात आली. रविवारी (२५ जानेवारी, २०२६) सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, एकूण १२५ जणांना शौर्य पदक (GM) प्रदान केले जाईल. ज्यामध्ये १२१ पोलीस दलातील आणि इतर ४ अग्निशमन सेवांमधील आहेत.

