राज्यांकडे ११.०२ कोटींहून अधिक कोरोना लसीचे डोस उपलब्ध : केंद्र

११.०२ कोटींपेक्षा जास्त शिल्लक आणि अप्रयुक्त कोविड लसीचे डोस राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये अजूनही उपलब्ध आहेत
Corona Vaccine
Corona Vaccinesakal

नवी दिल्ली : केंद्राकडून देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना लसीचे ११.०२ कोटींहून अधिक डोस पुरविण्यात आल्या आहेत. १६६.१७ कोटी (१,६६,१७,१६,३३५) पेक्षा जास्त लसीचे डोस सरकारच्या जातमुक्त चॅनेल अंतर्गत आणि थेट राज्य खरेदी श्रेणीद्वारे प्रदान केले गेले आहेत, असे मंत्रालयाने (Central Government) म्हटले आहे. (More than 11.02 crore doses of corona vaccine are available in the states)

११.०२ कोटींपेक्षा जास्त शिल्लक आणि अप्रयुक्त कोविड लसीचे डोस (corona vaccinne) राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये अजूनही उपलब्ध आहेत. याच्या उपलब्धतेद्वारे लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत कोरोना लस पुरवून त्यांना मदत करीत आहे. कोरोना लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या लसींच्या ७५ टक्के डोस राज्ये आणि केंद्रांना खरेदी आणि पुरवठा (विनामूल्य) करेल, असेही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Central Government) म्हटले आहे.

Corona Vaccine
भाजप आमदाराच्या सुनेचा गंभीर आरोप; म्हणाली, पतीचे अवैध संबंध

देशव्यापी कोरोना लसीकरण १६ जानेवारी २०२१ रोजी सुरू झाले. कोरोना लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा २१ जून २०२१ पासून सुरू झाला. आता देशातील कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होऊ लागली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com